माझे बॉलीवूडमधील सर्वांशी चांगले संबंध आहे. अक्षय कुमार यांनीच मला जेलमध्ये मारण्यासाठी माझी सुपारी दिली आणि मला अटक केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
अभिनेता केआरके मनोरंजन विश्वातील एक असा व्यक्ती आहे, जो नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांची अनेक विधाने अशी असतात की त्यामुळे ते अनेकदा अडचणीत येतात. आता तर केआरने बॉलिवूडचा अभिनेता अक्षयकुमार यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे केआरके पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केआरकेने त्यांच्या जीवाला अक्षयकुमार पासून धोका असल्याचे सांगितले आहे.
केआरकेने आपल्या नव्या ट्विटद्वारे अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासे केले आहे. केआरकेच्या म्हणण्यानुसार अक्षय कुमारने त्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली. इतकच नाही तर अक्षयला तुरुंगातच त्याचा खून करायचा होता. पण तो बाहेर आला.
केअरकेने आपल्या पहिल्या ट्विटवर म्हंटले की, 'माझे बॉलीवूडमधील सर्वांशी चांगले संबंध आहे. अक्षय कुमार यांनीच मला जेलमध्ये मारण्यासाठी माझी सुपारी दिली आणि मला अटक केली. परंतु मी भाग्यवान होतो म्हणून तुरुंगातून बाहेर पडलो. मला पोलिस स्टेशन किंवा जेलमध्ये मारण्यासाठी ते पुन्हा माझी सुपारी देत आहे. मला काही झाले तर अक्षय कुमार जबाबदार आहे. सलमान खान, शाहरुख खान किंवा करण जोहरचा माझ्या हत्येशी काहीही संबंध नाही.'
तर दुसऱ्या ट्विट मध्ये केआरके म्हणाले की, 'अक्षयकुमारच्या म्हणण्यानुसार मी त्यांना कॅनेडियन कुमार म्हणू नये, जर ते कॅनेडियन नॅशनल असतील तर मी त्यांना कॅनेडियन का म्हणू नये? त्यांची कॅनडात करोडो रुपयांची संपत्ती कशी? मी त्यांना नक्कीच कॅनेडियन कुमार म्हणेन. ते मला मारण्यासाठी त्यांच्या शक्तीचा वापर करणार असेल तर ठीक आहे.'
COMMENTS