त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यासाठी विविध उपाययोजना राबवून सुविधा देणे ही काळाची गरज आहे.
पेमराज सारडा महाविद्यालय व सीए असोसिएशनमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
अहमदनगर | नगर सह्याद्री
जग खुप गतिमान होत असल्याने शिक्षण पद्धतीही आधुनिक होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यासाठी विविध उपाययोजना राबवून सुविधा देणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार नगरच्या सारडा महाविद्यालय व सीए असोसिएशनमध्ये शिका, प्रशिक्षित व्हा व कमवा हा सामंजस्य करार केल्याबद्दल दोन्ही संस्थांचे अभिनंदन. हा करार विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरून त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणारा आहे. असे करार प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालय व सिए असोसिएशन मध्ये व्हावा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालय व सिए असोसीएशन मध्ये नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारा नुसार पेमराज महाविद्यालया मधील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबरच वाणिज्य क्षेत्राचे व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी सिए असोसीएशन शिका, प्रशिक्षित व्हा व कमवा या धर्तीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत नुकताच पेमराज सारडा महाविद्यालय व सिए असोसीएशन मध्ये हा महत्त्वपूर्ण करार झाला. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महाविद्यालय व सिए असोसिएशनमध्ये असा करार होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, सिए असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सारडा कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सुमतिलाल कोठारी, संचालक प्रा.मकरंद खेर, अनंत देसाई, मधुसूदन सारडा, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित, प्रबंधक अशोक असेरी, सिए असोसिएशनचे उपाध्यक्ष सनित मुथा, सचिव प्रसाद पुराणिक आदींसह सदस्य उपस्थित होते.
प्रा.शिरीष मोडक म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालय कायमच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. सिए असोसिएशन बरोबर हा महत्त्वपूर्ण करार होण्यासाठी संस्थेचे सदस्य अनंत देसाई यांनी पुढाकार घेतला. त्यांना सिए.ज्ञानेश्वर काळे यांनी चांगली साथ दिली. या करारा मुळे विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबरच प्रॅटिकल नॉलेज व स्टायपेमेंटही मिळणार आहे.
या करारा बद्दल अधिक माहिती देताना अनंत देसाई म्हणाले, सारडा महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना वर्षभर नगर शहरातील सिए असोसिएशनच्या सदस्यांकडे इंटरशिप करायची आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना बरोबरच अकाऊंट्सचे प्रत्यक्ष काम कसे चालते हे शिकण्यास मिळणर आहे. ऑडिट, जीएसटी, इन्कम टॅस आदींची सखोल माहिती मिळणार आहे. या व्यावहारिक ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना सिए होण्याबरोबरच अकाऊन्टंट म्हणूनही करियर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सीए असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे म्हणाले, सिए असोसिएशन विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. सारडा महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना आता आपले करियर करण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांना सिए असोसिएशनच्या विविध प्रशिक्षण शिबीर, अभ्यास दौरे व इतर उपयुक्त उपक्रमांमध्ये सहभगी होता येणार आहे.
आभार मानताना कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस म्हणाले, सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी सिए असोसिएशन बरोबरचा हा करार खूप उपयुक्त ठरणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे सांगून सिए असोसिएशनचे आभार मानले.
COMMENTS