या बदलांचा स्विकार करुन त्यादृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. आज मार्कांची जागा ग्रेडने घेतली आहे.
सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण
अहमदनगर | नगर सह्याद्री
दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहे. या बदलांचा स्विकार करुन त्यादृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. आज मार्कांची जागा ग्रेडने घेतली आहे. त्यामुळे या स्पर्धेचे युगात विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी आधुनिक शिक्षण देणे आवश्यक झाले आहे. शिशु संगोपन संस्थेच्या सर्व शाळांमध्ये सर्वसामान्य घरातील मुला-मुलींना चांगले शिक्षण व संस्कार देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी प्रगती होत असून, विद्यार्थीही पालक व शाळेचे नाव उंचावत आहेत. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अडचण येऊ नये यासाठी शासनाने मोफत पाठ्यपुस्तके व इतर सुविधा पुरविण्यात येत आहेत. या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करुन विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन आपली प्रगती साधावी. शाळेच्या चांगल्या उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशाला व श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, खजिनदार अॅड.विजयकुमार मुनोत, सहसचिव राजेश झालानी, विश्वस्त बन्सी नन्नवरे, मनसुखलाल पिपाडा, संजय चोपडा, रमेश छाजेड, मुख्याध्यापिका सौ.योगिता गांधी, प्राचार्या कांचन गावडे, अभिजित खोसे, योगेश ठुबे, गौरव कुर्हाडे, मळू गाडळकर, बंटी तागड, राजेश सुद्रीक, दुर्वेश चव्हाण, निलेश हिंगे आदि उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष दिलीप गुंदेचा म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी संस्थेच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांनाचा लाभ संबंधी विद्यार्थ्यांना मिळवून देऊन त्यांची प्रगती साधली जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा पुरविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होईल, यासाठी संस्थेचे प्रयत्न असतात.
प्रास्तविकात उपाध्यक्ष दशरथ खोसे म्हणाले, संस्थेच्यावतीने नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा, परिक्षा, खेळ, कला आदिंसाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांच्या कला-गुणांनाही वाव दिला जात आहे. राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी ही यशाचे शिखर गाठत आहेत, याचा संस्थेला अभिमान असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनिता बेरड यांनी केले तर आभार विजय मुनोत यांनी मानले.
COMMENTS