१७ वर्षीय मुलाने आपल्या आईबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल एका व्यक्तीची हत्या केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईत एका १७ वर्षीय मुलाने आपल्या आईबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल एका व्यक्तीची हत्या केली. मृत अब्दुल रहीम मलिक (४३) हा कांदिवलीच्या इराणीवाडी भागात राहणारा असून तो अनेकदा मुलाच्या आईवर अपमानास्पद टिप्पणी करायचा.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी त्या व्यक्तीने मुलाच्या आईसोबत गैरवर्तन केले, त्यानंतर महिलेने कांदिवली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. रागाच्या भरात मुलाने व्यक्तीच्या डोक्यावर आणि मानेवर स्क्रू ड्रायव्हरने वार केले.
जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
COMMENTS