अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
अहमदनगर | नगर सह्याद्री
समाजामध्ये वावरत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते, या भावनेतून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत गरजूंपर्यंत मदत पोहोचवावी. अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
आ. जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार अरुण जगताप, प्रा. माणिकराव विधाते, संजय चव्हाण, दत्ता मुदगल, संजय खामकर, संजय चोपडा, राजेंद्र गांधी, प्रीतम पोखरणा, राजेंद्र ताथेड, प्रफुल्ल मुथा, बापूसाहेब गोरे, प्रविण शिंगवी, विकास सुराणा, बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, सुरेश बनसोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
माझ्या वाढदिवसानिमित्त बुके शाल घेऊन न येण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यामध्ये तपोवन रोडवरील बालभवन येथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व किराणा साहित्याचे वाटप केले. महावीर चषक परिवारातर्फे अरुणोदय व पांजरपोळ गो शाळेत चारा वाटप केले. अनाथाश्रमात भोजन देण्यात आले. उद्योजक संजय चव्हाण यांनी गरजू विद्यार्थ्यांला ११ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. चर्मकार विकास संघ गटई आघाडीने स्टॉल योजनेतील परवाने वितरित केले.
विवध संघटना, मित्र परिवार, सामाजिक संस्थांनी जमा केलेल्या शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देत शालेय साहित्य देत वाढदिवस साजरा करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे देखील असेच उपक्रम राबवावे, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
COMMENTS