सरस्वती आणि मनोज साने दोघेही काही वर्षे एकत्र राहत होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, साने हा लैंगिक वासनेच्या आहारी गेला होता.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईतील मीरा रोड भागात सरस्वती वैद्य हिच्या हत्येने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेत आरोपी मनोज साने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेला जवळपास आठवडा उलटून गेला आहे. दरम्यान, याप्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत. पोलीस तपासात सरस्वतीच्या हत्येमागचे कारण समोर आले आहे.
सरस्वती आणि मनोज साने दोघेही काही वर्षे एकत्र राहत होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, साने हा लैंगिक वासनेच्या आहारी गेला होता. त्याच्या फोनच्या सर्च हिस्ट्रीमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. त्याने आपल्या डायरीमध्ये देखील या वेबसाईटची नोंद करुन ठेवली होती.
साने लैंगिक वासनेच्या आहारी गेल्याने तो अश्लील व्हिडिओ पहायचा. त्याने अनेक डेटिंग ॲपवर आपले अकाउंट सुरू केले होते. सरस्वती घरी नसताना तो या मुलींशी बोलत असे. त्यांना घरी बोलवायचा. साने एका डेटिंग अॅपवरुन साने अन्य मुलींच्या संपर्कात असल्याचे सरस्वतीला समजले.यावरून तिने त्याच्याशी वाद घातला. दोघांमध्ये जोरदार भांडण झाली. त्यानंतर सानेने आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मनोजने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले आहे की, मी सरस्वतीची हत्या केली नसून तिने स्वत:च आत्महत्या केली आहे. आपण पकडले जाऊ म्हणून तिच्या शरीराचे तुकडे केले, असे साने म्हणत आहे. मात्र पोलिसांना त्याच्या या बोलण्यावर विश्वास नाही. ही हत्या मनोजनेच केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र हत्या नेमकी कशी केली याचा शोध पोलीस घेत आहेत.
COMMENTS