दहिगाव गावंडे शेतशिवार येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून खून, आत्महत्या अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. आता अकोल्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहिगाव गावंडे शेतशिवार येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिगाव गावंडे शेतशिवार येथे एका चाळीस वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत अपघात झाल्याची शक्यता बोरगाव पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही महिला विधवा असून तिला २ मुले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या माहेरी म्हणजेच दहिगाव गावंडे येथे राहत होती. काही दिवसांपासून ती गावातून बेपत्ता होती. दहिगाव गावंडे येथील शेतातील खड्ड्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहावर काटेरी झुडूप टाकलेली होती. मृतदेह अर्धवट जळाला होता. मृतदेहाची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. दुसरीकडे घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सरोपचार रुग्णालयात पाठवला. या महिलेचा अपघात झाला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे. याचा अधिक तपास बोरगाव पोलीस करत आहेत.
COMMENTS