मनोज साने सतत अश्लिल व्हिडिओ पाहत होता. त्या साईडची नावे त्याच्या लक्षात राहत नसल्याने एका नोटपॅडवरही लिहून ठेवली होता
मुंबई / नगर सह्याद्री -
मीरा रोड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनरच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज साने (वय ५६ वर्षे) याच्यावर प्रेयसीचा खून केल्याचा आरोप आहे. मनोजला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
मनोज साने आणि ३२ वर्षीय तरुणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र दोघांमधील वयाचे अंतर मोठे असल्याने त्यांनी आपले नाते लपवले होते. मनोज सानेच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या घरातून काही साहित्य जप्त केले. त्याचा फोनही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मनोज यांच्या फोनची संपूर्ण झडती घेतली आहे. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा शोध त्यांनी घेतल्याचे शोध सर्चहिस्ट्रीमध्ये दिसत आहे.
४ जून रोजी मुलीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मनोज हा तिच्यासोबत दोन दिवस त्या खोलीत राहिला. हत्येनंतर आरोपींनी सरस्वतीच्या मृतदेहाचे इलेक्ट्रिक ट्री कटरच्या साहाय्याने छोटे तुकडे केले होते. यानंतर आरोपींनी हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. त्याने काही तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक केले.
पोलिसांनी त्याचा फोन चेक केल्यावर त्यामध्ये त्याने या सर्वगोष्टी सर्च केल्याचे दिसत आहे. मनोज साने सतत अश्लिल व्हिडिओ पाहत होता. त्या साईडची नावे त्याच्या लक्षात राहत नसल्याने एका नोटपॅडवरही लिहून ठेवली होता .
COMMENTS