अंमली पदार्थची विक्रीही वाढत आहे. कस्टम विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईत पुण्यात पाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
मुंबई / नगर सह्याद्री -
पुणे शहर शांत, सुरक्षित आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र, अलीकडे शहराच्या ओळखीला आग लागली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत.
अंमली पदार्थची विक्रीही वाढत आहे. कस्टम विभागाने नुकत्याच केलेल्या कारवाईत पुण्यात पाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पुण्यात ही ड्रग्स येतात तरी कोठून, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पुण्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या अमली पदार्थांचा साठा जप्त झाल्याने पोलिसांचीही चिंता वाढली आहे. पुणे शहरात सध्या अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या 5 महिन्यात 7 कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. कोकेन, गांजा, एमडी अशा अनेक अमली पदार्थांची पुण्यातील विविध भागांतून तस्करी होताना दिसत आहे.
आज हजारो लोक शिक्षण आणि व्यवसायासाठी पुण्यात येत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून तरुण पिढी अमली पदार्थांच्या तस्करीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. 4-5 दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक धक्कादायक बाब समोर आली. उच्चभ्रू मुली, परदेशातून शिक्षणासाठी येणारे तरुण, हातात जास्त पैसा असलेले स्थानिक, बांधकामासाठी येणारा कमी शिकलेला वर्ग हे सगळेच व्यसनाच्या आहारी जातात.
खिशात सहजपणे उपलब्ध झालेला पैसा आणि घरापासून लांब राहत असलेली ही तरुण वर्ग बेफाम होत चालला आहे. त्यांच्यावर वेळीच अंकुश लावला नाही तर पुण्याची धर्मनिरपेक्षता नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मात्र शिक्षणाचे माहेरघर म्हणवले जाणारे हे शहर अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकत चालले हे मात्र कटू सत्य आहे.
COMMENTS