बदलापुरात शहरात्त शेजाऱ्यांनीच शेजाऱ्याच्या घरातून चोरी केली असून कपाटातील सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
बदलापुरात शहरात्त शेजाऱ्यांनीच शेजाऱ्याच्या घरातून चोरी केली असून कपाटातील सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बदलापूर पश्चिम येथील चिंतामणी तथास्तु अपार्टमेंटमध्ये शेजाऱ्यांने शेजाराच्या घरातून चोरी केल्याने नागरिकांचा विश्वास या शब्दावरचा विश्वासच नाहीसा होत आहे. तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर जात असाल आणि घराच्या चाव्या आणि जबाबदारी शेजाऱ्याकडे सोपवत असाल तर जागे व्हा. बदलापूर पश्चिम येथील तथास्तु ओपरेटिव्ह सोसायटीत राहणारे निनाद देसाई हे आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांताक्रूझ येथे गेले होते. मात्र जाताना त्यांनी आपल्या घराची चावी सोसायटीचे चौकीदार व शेजारी राहणारे रवींद्र हरी विशे यांना दिली होती.
दरम्यान, त्यांनी घरी येऊन घराची पाहणी केली असता सर्व काही ठीक होते. मात्र कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने गायब होते. यामध्ये सोन्याचे नेकलेस, ब्रेसलेट, अंगठी असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज असून याप्रकरणी निनाद देसाई यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि हरवलेले दागिने परत करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी कारवाई करताना शेजारी राहणारा रवींद्र हरी विशे आला याला संशयित आरोपी मानून अटक केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
COMMENTS