भंडारा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकलारी गावात एका विवाहितेचा रक्ताने माखलेला मृतदेह तिच्याच घरात आढळून आला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
भंडारा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकलारी गावात एका विवाहितेचा रक्ताने माखलेला मृतदेह तिच्याच घरात आढळून आला आहे. मात्र पतीनेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
येनुबाई कंठीराम बालपांडे (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याचे मुलाला आढळून आले. याबाबत मुलाने पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनेपासून मृतक येनुबाई यांचा पती कुठेही आढळून आला नाही. यामुळे पतीनेच कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या केली असावी, असा संशय वरठी पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस मृतक महिलेच्या पतीचा शोध घेत असून पुढील तपास सुरु आहे.
COMMENTS