कल्याणमधून एक बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
कल्याणमधून एक बातमी समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.
कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात दोघांनी गोळीबार केला आसून समोर आलेल्या माहितीनुसार, विवेक नायडू आणि प्रथमेश ठमके अशी या दोघांची नावे आहेत. काळातलाव परिसरात चंदन भदोरिया नावाच्या व्यक्तीच्या शोधात आले होते.
यावेळी त्यांनी चंदनचा पत्ता विचारला मात्र तो सांगण्यास नकार दिल्याने दीपक साळवी नावाच्या तरुणाला मारहाण केली. तसेच परिसरात गाड्यांचीही तोडफोड केल्याचे समोर आले आहे. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांनी गोंधळ घातला.
विवेक आणि प्रथमेश दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांचे चंदन नावाच्या व्यक्तीसोबत जुने भांडण होते. या वादामुळे दोघेही काल चंदनला शोधण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. भरवस्तीत झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
COMMENTS