टिकू वेड्स शेरूच्या ट्रेलरमध्ये ४९ वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि २१ वर्षीय अवनीत कौर यांचा बोल्ड किसिंग सीन दाखवण्यात आला आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या टिकू वेड्स शेरू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच वादाचा विषय बनला आहे. टिकू वेड्स शेरूच्या ट्रेलरमध्ये ४९ वर्षीय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि २१ वर्षीय अवनीत कौर यांचा बोल्ड किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, अवनीत कौर आणि चित्रपटाची निर्माती कंगना राणौत यांना सोशल मीडियावर ट्रॉल केले जात आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले एक दृश्य लोकांच्या नजरेत आले आहे. खरं तर, 'टिकू वेड्स शेरू'च्या ट्रेलरमध्ये २१ वर्षीय अवनीत कौर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला किस करताना दिसत आहे. त्यामुळे आता हा ट्रेलर यूजर्सच्या निशाण्यावर आला आहे.
खरे तर चाहते चित्रपटाच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत. कारण, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या वयात २८ वर्षांचे अंतर आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाची कथा दोन प्रेमी युगुलांमधील असून त्यासाठी दोघांनाही कास्ट करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली नाही. यानंतर नवाज आणि अवनीत यांना सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे.
सोशल मीडियावर दोघांचा किसिंग सीन पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'अवनीत कौर नवाजच्या मुलीच्या वयाची आहे. या लोकांना अजिबात लाज वाटत नाही. दुसर्या यूजरने लिहिले की, 'अवनीतला नवाजसोबत कोणत्या विचाराने कास्ट केले आहे.' यावर कमेंट करताना तिसर्या यूजरने लिहिले की, 'आजकाल चित्रपटांमध्ये काहीही दाखवले जात आहे.'
COMMENTS