दीपिका कक्करचा पती शोएबने सांगितले की, '२१ जून रोजी सकाळी त्यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. डिलिव्हरी प्री-मॅच्युअर होती.
मुंबई / नगर सह्याद्री -
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आई झाली आहे. तिने एका लाडक्या मुलाला जन्म दिला आहे. दीपिका कक्करचा पती शोएब इब्राहिमने सांगितले की, '२१ जून रोजी सकाळी त्यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. डिलिव्हरी प्री-मॅच्युअर होती. घाबरण्यासारखे काहीही नाही सर्व काही ठीक आहे. या गुड न्यूजनंतर अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमच्या चाहते आनंदी झाले आहे.
डॉक्टरांनी दीपिकाला जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याची तारीख दिली होती. दीपिकाने तिच्या व्लॉगमध्ये याबाबत माहिती दिली होती. आता दीपिकाने प्रीमॅच्युअर डिलीव्हरीतून मुलाला जन्म दिला आहे. शोएबने त्याच्या इन्स्टा पोस्टवर लिहिलेकी, "मी लवकरच बाबा बनणार आहे आणि मी लवकरच माझ्या आयुष्याच्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करणार आहे." मी आता थांबू शकत नाही. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल धन्यवाद."
जानेवारीमध्ये दीपिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. एका मुलाखतीदरम्यान दीपिकाने अभिनय न करण्याबद्दलही सांगितले. दीपिकाने सांगितले होते की, ती काही काळ आपल्या मुलाची काळजी घेईल. दुसरीकडे, शोएबबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो स्टार भारतच्या अजुनी शोमध्ये दिसत आहे. चाहत्यांना हा शो खूप आवडतो.
COMMENTS