सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीशी ओळख झालेल्या दोन तरुणांनी आपल्या अपहरणाचा कट रचल्याची तक्रार तरुणीने पोलिसांत दिली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीशी ओळख झालेल्या दोन तरुणांनी आपल्या अपहरणाचा कट रचल्याची तक्रार तरुणीने पोलिसांत दिली आहे. यानंतर संगमनेर पोलिसांनी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली. हे दोन्ही तरुण बिहारचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची अधिक माहिती अशी - 2 वर्षांपूर्वी तरुणीची दोन तरुणांशी पब्जी गेमच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर हा तरुण संबंधित तरुणीला भेटण्यासाठी गेला. या तरुणांनी मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने पोलिसांत दिली आहे.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बिहार राज्यातील अकरम शेख आणि नेमतुल्लाला अटक केली. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी हा प्रकार लव्ह जिहाद आणि अधार्मिक असल्याचा आरोप केला आहे. हे धर्मांतर होते की लव्ह जिहाद, हे पोलीस तपासात उघड होईल, असेही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले
दरम्यान आज (शनिवार) दुपारी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती संगमनेर पाेलिसांनी दिली.
COMMENTS