मुंबई| नगर सहयाद्री बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. फक्त चर्चेत नाही तर बर्याच वेळा कंगना राणावत ...
मुंबई| नगर सहयाद्री
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. फक्त चर्चेत नाही तर बर्याच वेळा कंगना राणावत ही मोठ्या वादात देखील सापडते. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बॉलिवूडचे कलाकार असतात. कंगना राणावत ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. विषय हा कोणत्याही असो कंगना आपले मत मांडताना कधीच कोणाचा अजिबात विचार करत नाही आणि यामुळेच अनेकदा ती वादाच्या भोवर्यात सापडते.
कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याच्यावर टीका केलीये. रामायण चित्रपटात रणबीर कपूर हा दिसणार असल्याचे कळताच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने नाराजी व्यक्त केली. टीकू वेड्स शेरू या चित्रपटामुळे सध्या कंगना राणावत ही चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कंगना राणावत दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच कंगना राणावत हिने खुलासा करत सांगितले होते की, तिचे बॉलिवूडच्या सुरूवातीचे दिवस नेमके कसे होते आणि तिला कशाप्रकारे बॉलिवूडमध्ये नाव करण्यासाठी संघर्ष हा करावा लागला. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे कंगना राणावत ही प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये कंगना राणावत हिने अत्यंत मोठी इच्छा व्यक्त केली आहे.
COMMENTS