प्रधानमंत्री यांच्या यशस्वी पदार्पण दिनानिमित्त सुप्यात मोदी @ ९ कार्यक्रम उत्साहात सुपा | नगर सह्याद्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच...
प्रधानमंत्री यांच्या यशस्वी पदार्पण दिनानिमित्त सुप्यात मोदी @ ९ कार्यक्रम उत्साहात
सुपा | नगर सह्याद्री
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री म्हणून यशस्वी नऊवर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुपा येथे मोदी ऽ ९ या संकल्पनेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध विषयांवर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राम स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून सुपा गावात शिवतीर्थ या ठिकाणी मोदी ऽ ९ व्यापारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ही बैठक आमदार उषाताई खापरे, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत आमदार यांनी व्यापार्यांना केंद्र शासनाच्या व राज्य शासन योजनांच्या आधारे व्यापार वाढवण्यासाठी संबोधित केले.
त्याच बरोबर सागर मैड यांच्याकडून समाजा साठी विविध योजना राबवण्यात येतात. त्यातील जलशुध्दीकरण संच अल्प दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करुण दिले आहेत. आज त्यातील जलशुद्धीकरण संच्याच्या १०० व्या नगाचे वितरण सागर मैड संपर्क कार्यालय या ठिकाणी करण्यात आले.
या बैठकीस सुपा गावातील व्यापार्यांसह प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष सुनील थोरात, सुभाष दुधाडे, सागर मैड, विश्वास रोहकले, बडवे काका, संतोष ढवळे, मधुकर लोकरे, निखिल पवार, संपत पवार, महेश आल्हाट, निखिल पठारे, सुरज काळे, नितीन भालेकर, सत्यम थिटे, नवनाथ सालके, संदिप पाटील सालके, बाळू शिंदे, आतकर काका, अमोल मैड आदी उपस्थित होते.
COMMENTS