महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या टीकेला प्रत्युत्तर पारनेर | नगर सह्याद्री मला दुसर्यांदा आमदार व्हायचे की नाही ते माझी जनता ठरवील. मात्र...
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या टीकेला प्रत्युत्तर
पारनेर | नगर सह्याद्री
मला दुसर्यांदा आमदार व्हायचे की नाही ते माझी जनता ठरवील. मात्र, तुमच्या पोराला दुसर्यांदा खासदार करायचे की नाही ते आम्ही ठरवू असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी महसुलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांना दिले. पारनेर तालुयातील बाबुर्डी येथील एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात लंके बोलत होते. जनता जनार्दन व मायबाप जनता जोपर्यंत माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मला चिंता करण्याचे कारण नाही अशी आमदार लंके म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर टीका केली होती.नीलेश लंके यांना राजकारणात खूप शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करीत राहतात. ते पहिल्यांदा निवडून आले आहेत.
मला वाटतं त्यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही, अशी टीका पालकमंत्री विखे-पाटील यांनी आमदार लंके यांच्यावर केली होती. पालकमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत लंके यांनी शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमदार लंके म्हणाले, लंकेंना दुसर्यांदा आमदार व्हायचे नाही असे दिसते, अशी टीका करता. मला दुसर्यांदा आमदार व्हायचेय की नाही ते माझी जनता ठरवील. पण तुमच्या पोराला दुसर्यांदा खासदार व्हायचे की नाही ते आम्ही ठरवू, असे लंके यांनी म्हटले आहे.
COMMENTS