चक्रीवादळामुळे समुद्रात लाटा उसळण्याची शक्यता ः मच्छिमारांना इशारा नवी दिल्ली | वृत्तसंस्था भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आग्नेय अर...
चक्रीवादळामुळे समुद्रात लाटा
उसळण्याची शक्यता ः मच्छिमारांना इशारा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आग्नेय अरबी समुद्रावरील दबाव मंगळवारी संध्याकाळी ’बिपरजॉय’ चक्रीवादळात बदलला. त्यामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सून आणखी लांबण्याची शक्यता आहे.
‘बिपरजॉय’ नाव बांगलादेशने दिले आहे. हे वादळ सध्या ४ किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे ९२० किमी आणि मुंबईपासून १०५० किमी दक्षिण-नैऋत्य दिशेने आहे. ते उत्तरेकडे सरकण्याची आणि हळूहळू अतिशय तीव्र चक्री वादळात बदलण्याची दाट शयता आहे. त्याच्या प्रभावाखाली ६ जूनला केरळ-कर्नाटक आणि लक्षद्वीप किनार्याजवळ आणि ८ ते १० जूनपर्यंत कोकण, गोवा, महाराष्ट्र किनार्यालगत आणि त्याच्या बाजुने जोरदार वार्यासह समुद्रात उंच लाटा उसळण्याची शयता आहे. हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रातून परतण्याचा सल्ला दिला आहे.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन लांबणार आहे. आयएमडीनुसार यावेळी मान्सून जूनच्या दुसर्या आठवड्यात केरळमध्ये पोहोचेल. त्याच वेळी खासगी हवामान एजन्सी स्कायमेटने सांगितले की, मान्सून ८-९ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. केरळमध्ये १ जूनला दाखल होणारा मान्सून ५ जूनला दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते, पण हा अंदाज बरोबर नव्हता. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. २०२१ मध्ये १ जूनला पोहोचला होता. चक्रीवादळामुळे मान्सूनचे ढग चार दिवसांपासून एकाच ठिकाणी थांबल्याचे हवामान खात्याने सांगितले.
पुढील पाच दिवस अरबी समुद्रात ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. येत्या २४ तासांत अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बुधवारी किंवा गुरुवारी त्याचे डिप्रेशन होण्याची शयता आहे. याचा अर्थ पुढील पाच दिवस मध्य, दक्षिण आणि पूर्व मध्य अरबी समुद्रात ५० किमी प्रतितास वेगाने वारे आणि पाऊस सुरू राहील. केरळच्या काही भागात हलका पाऊस पडत आहे. चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे केरळ किनारपट्टीवर वारे कमकुवत होत आहेत. १४ पैकी १० स्थानकांऐवजी केवळ तीन-चार स्थानकांवर पावसाची नोंद झाली आहे. तथापि, आठवड्याच्या अखेरीस केरळ आणि किनारी कर्नाटक प्रदेशात पाऊस सुरू होण्याची शयता आहे; पण तो मान्सूनचा नसेल.
७ राज्यांमध्ये पावसाची आणि ८ राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शयता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार ८ जूनपर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये धुळीच्या वादळासह हलका पाऊस पडण्याची शयता आहे. तसेच बिहार, पश्चिम बंगाल, ईशान्य आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, सिक्कीम, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शयता आहे.
COMMENTS