श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा तालुयातून खाण्यास बंदी असलेल्या मांगुर या माश्याची मत्स्य व्यवसाय अधिकार्यांच्या आशीर्वादाने सिना धरणा...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुयातून खाण्यास बंदी असलेल्या मांगुर या माश्याची मत्स्य व्यवसाय अधिकार्यांच्या आशीर्वादाने सिना धरणातून परप्रांतीयांच्या सहाय्याने पकडत शेकडत्ते टन माशांची विक्री होत आहे. परप्रांतीय कामगारांच्या दहशतीने स्थानिक मासेमार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
श्रीगोंदा तालुयातील तरडगव्हाण येथील येडूमाई मच्छीमार सहकारी संस्थेला सीना धरणातील शरीरास अपायकारक असल्याने खाण्यास बंदी असलेल्या मांगुर या जातीच्या माश्याला पकडून नष्ट करण्याच्या अटीवर मासेमारी करण्याची परवानगी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) यांनी दिली आहे. परंतु मासे मारी करण्याची परवानगी दिलेल्या संस्थेने नष्ट करण्यासाठी पकडलेल्या मांगुर या माश्याची राजरोस पणे विक्री होत आहे.
परप्रांतीयांमुळे तरडगव्हाण, चवर सांगवी, थिटे सांगवी, घोगरगाव, बनपिंपरी, आदी परिसरातील छोट्या मच्छिमार व्यावसायिकांची उपासमार होत आहे. या बाबतची तक्रार स्थानिक मच्छिमारांनी केली आहे. याबाबत सखोल चौकशी करून परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील मच्छीमारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान, मांगूर मासा नष्ट करताना पंचनामा करत फोटो, व्हिडिओ काढून नष्ट करण्याचे बंधनकारक असताना या गोष्टीची कोणतीही काळजी मत्स्य व्यवसायाचे अधिकारी आणि संस्थेच्या पदाधिकार्यांनी घेतली नसल्याचे माहिती आहे. या प्रकरणाचीही सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
COMMENTS