उपोषणाची नौटंकीमुळे गावचे नुकसान पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील वडनेर हवेली येथे जलजीवनच्या माध्यमातून १ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर ...
उपोषणाची नौटंकीमुळे गावचे नुकसान
पारनेर | नगर सह्याद्री
तालुयातील वडनेर हवेली येथे जलजीवनच्या माध्यमातून १ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु हे काम सुरू होण्या अगोदरच एका नेत्याच्या सांगण्यावरून सरपंचासह स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत समोर उपोषण केले. पाणी योजनेच्या उपोषणाला टक्केवारीचा वास असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते सतीश भालेकर यांनी केली आहे. तर या उपोषणाच्या नौटंकीमुळे गावचे नुकसान होणार असून ठेकेदारापेक्षा पाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षा भालेकर यांनी व्यक्त केली आहे. ठेकेदार बदलण्याचा अट्टाहास का? असाही सवाल भालेकर यांनी केला आहे.
वडनेर हवेलीसाठी १ कोटी ९९ लाख रुपयाचा निधी जलजीवन अंतर्गत मंजूर झाला आहे. हे काम मोठे आहे. त्यामुळे या संदर्भात विशेष ग्रामसभा घेणे गरजेचे होते. एक वर्षाहून अधिक कालावधीत ग्रामसभा झालेली नाही. कोणत्याही मासिक मीटिंग मध्ये किंवा ग्रामसभेत हा विषय का घेतला नाही. गावाचा विषय असताना ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नसून लोकनियुक्त सरपंच असल्याने हेकेखोर पणे निर्णय ग्रामस्थांवर लादण्याचा प्रयत्न होत आहे.
-सोनाली विकास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, वडनेर हवेली
या पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ठेकेदार नियुक्त केलेला आहे. ठेकेदाराकडून आराखडा तयार असून सरपंचांनी उगम स्थानाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास दिला असताना आणि तो अजून मंजूर नसताना ठेकेदाराकडून काम चालू करण्याची सरपंचाची अपेक्षा व त्या कारणाने ठेकेदार बदलायचा अट्टाहास का? यासाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणे म्हणजे जल जीवनचे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप इंजिनिअर सतीश भालेकर यांनी केला आहे.
वडनेर हवेली येथे लोक सहभागातुन पाणी व जाणिव फाउंडेशनच्या माध्यमातून चाळीस लाखाहून अधिक कामे वडनेर हवेलीत केले. त्यामध्ये लोकसभाग असताना ग्रामपंचायतच्या कुठलाही योजनेचा सहभाग त्यामध्ये नव्हता १० लाख बक्षिस मिळाले ते खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतला त्यावेळी ग्रामसभा घेणेबाबत विनंती केली होती. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामसभा घेण्यास नेहमीच टाळाटाळ होत आहे.
-विलास भालेकर, ग्रामस्थ
COMMENTS