पारनेर खरेदी विक्री संघ निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा खासदार सुजय विखेंकडून सत्कार पारनेर | नगर सह्याद्री- माजी खासदार कै. बाळासाहेब विखे प...
पारनेर खरेदी विक्री संघ निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा खासदार सुजय विखेंकडून सत्कार
पारनेर | नगर सह्याद्री-
माजी खासदार कै. बाळासाहेब विखे पाटील, त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता खासदार म्हणुन माझ्यावर जो विश्वास पारनेरकर दाखवत आहेत. तो विश्वास सार्थ ठरवुन खरेदी विक्री संघ उर्जितावस्थेत आणुन मतदारांची उतराई करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
लोणी प्रवरा (ता.राहता) येथील जनसेवा कार्यालयात पारनेर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा विखे गटाने सर्व जागा जिंकून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्याबद्दल १५ उमेदवार व पॅनल प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी विजयी उमेदवारांना खासदार डॉ.विखे यांनी मार्गदर्शन केले.
लोकप्रतिनिधींकडून खरेदी विक्री संघ निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. ते स्वतः व पक्षाचे पदधिकारी मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे करत होते. आम्ही मात्र प्रचार यंत्रणेवर जोर देत शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि सर्व उमेदवार एकहाती निवडून आले आहेत.
- राहुल शिंदे पाटील, युवा नेते पारनेर
COMMENTS