मुंबई| नगर सहयाद्री बॉलिवूड दबंग अभिनेता सलमानचा दबंग आणि त्याचे सिक्वेल बॉस ऑफिसवर फारच गाजले. दबंग प्रमाणे, दबंग २’ आणि दबंग ३’ ने चांगली...
मुंबई| नगर सहयाद्री
बॉलिवूड दबंग अभिनेता सलमानचा दबंग आणि त्याचे सिक्वेल बॉस ऑफिसवर फारच गाजले. दबंग प्रमाणे, दबंग २’ आणि दबंग ३’ ने चांगली कमाई केली होती. मात्र आता सलमान चित्रपटामुळे नाही तर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आला आहे. २०१९ मध्ये घडलेला तो किस्सा सांगताना अभिनेत्री भावूक झाली. हेमा शर्मा असे तिचे नाव असून तिने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. हेमा म्हणते, मला दबंग ३’ मध्ये काम करायचे होते. त्यासाठी शय असेल तितके सर्व प्रयत्न केले, कारण मला सलमान सरांना भेटायचं होतं. चित्रपटात माझा पहिला सीन सलमान सरांसोबत होता.
त्यामुळे त्यांना भेटण्याची संधी मिळणार असल्याने मी खूश होते. मात्र तो सीन माझ्या शिवाय शूट करण्यात आला. त्यामुळे मी निराश झाले. शूट संपल्यानंतर एकदा तरी मला सलमान सरांना भेटण्याची इच्छा होती. मी त्यांना भेटण्यासाठी जवळपास ५० लोकांसोबत बोलले होते. मी पंडित जनार्दन यांची भेट घेतली होती, त्यांच्याकडे मी सलमान सरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी मला त्यांच्या भेटीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आम्ही सलमान सरांना भेटायला गेल्यावर मला किती वाईट वागणूक मिळाली आणि माझा किती अपमान झाला हे मी सांगू शकत नाही.
तिकडे मला त्यांनी कुत्र्यासारखे बाहेर फेकले. कारण मला त्यांच्याबरोबर फोटो काढायचा होता. त्यांनी माझा १०० लोकांसमोर अपमान केला. त्यात मला वैयक्तिक ओळखणार्या अनेकांचा समावेश होता. या घटनेनंतर मला १० दिवस झोप येत नव्हती. त्यावेळी सलमान सर आजूबाजूला होते, ते हस्तक्षेप करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. यापुढे मी कधीच त्यांना भेटायला जाणार नाही.
COMMENTS