जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा अहमदनगर | नगर सह्याद्री अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खर्या अर...
जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा
अहमदनगर | नगर सह्याद्री
अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खर्या अर्थाने रयतेचे राजे होते. आजच्या इतके तंत्रज्ञान नसताना त्यांना आदर्श राज्यकारभार चालवला. सर्वसामान्यांना अपेक्षित राजसत्त्ता त्यांनी दाखवून दिली. त्यांच्या राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला होता. प्रशासक म्हणूनही छत्रपतींच्या कार्यापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होउ नये हीच त्यांची भूमिका असाययी. महाराज अष्टप्रधानमंडळ चालवायचे. निर्णय घेताना ते अष्टप्रधान मंडळाचा सल्ला घेऊन रयतेचे हित कशात आहेत हे त्यांनी पाहिले. कोणत्याही नागरिकाला प्र्रशासनाचा जाच होणार नाही, ही बाब महत्वाची आहे. याच संकल्पनेनुसार सध्या शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. प्रशासनाची सजगता लोकापर्यंत पोहचली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी ६ जून हा शिवस्वराज्यभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनिलकुमार पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, मनोज ससे, डॉ.मुकुंद राजळे, भास्कर पाटील, पांडुरंग गायसमुद्रे, राधाकिसन देवढे, अशोक कडूस, राजू लाकूडझोडे आदी उपस्थित होते. यावेळी शाहीर कल्याण काळे यांचा पोवाड्याचा भव्य कार्यक्रम झाला.
प्रास्ताविकात संभाजी लांगोरे म्हणाले की, शासन २०१६ पासून शिवस्वराज्य दिन साजरा करीत आहे. जनतेसाठी आदर्श राज्य कसे करायचे याची त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी जवळपास ३६० गड किल्ले बांधले. ते स्वत: अतिशय कसबी इंजिनिअर होते. त्यामुळेच आजही तो इतिहासाचा ठेवा आपल्याला साडेतीनशे वर्षांनीही पहायला मिळतो. विविध उपक्रम राबविताना शिवरायांच्या आदर्श राज्य पध्दतीचा उपक्रम प्रशासनाने राबविले पाहिजे. शासन आपल्या दारी अभियानातून प्रत्येक लाभार्थीला लाभ मिळेल याची काळजी घेण्याची गरज आहे. नगर जिल्ह्यात उद्दीष्टपूर्ती करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचा सामूहिक प्रयत्न असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. राहुल शेळके यांनी आभार मानले.
COMMENTS