मुंबई| नगर सहयाद्री ड्रामा क्वीन राखी सावंत दुबईला गेली होती. ती मुंबईत परतली आहे. पुरस्कार सोहळ्यांमुळे आपण देशाबाहेर असल्याचे तिने सांगित...
मुंबई| नगर सहयाद्री
ड्रामा क्वीन राखी सावंत दुबईला गेली होती. ती मुंबईत परतली आहे. पुरस्कार सोहळ्यांमुळे आपण देशाबाहेर असल्याचे तिने सांगितले. तिच्या अकादमीतील मुलांचा परफॉर्मन्स होता आणि म्हणून तिथे तिला एक महिना लागला. राखी सावंतने सांगितले की, तिने दुबईमध्ये स्वतःचे क्लब आणि हॉटेल खरेदी केले आहे. तसेच आदिल खान दुर्राणी प्रकरणावर अपडेट देताना तिने दुबईमध्ये नवीन प्रेम सापडल्याचे संकेत दिले आहे.
लग्नानंतर काही दिवस राखी सावंत ही आनंदामध्ये दिसली. मात्र, त्यानंतर आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना राखी दिसली. यांचे प्रकरण थेट कोर्टात गेले. आता सध्या आदिल दुर्रानी हा जेलमध्ये आहे. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर केलेल्या आरोपांनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आदिल दुर्रानीबद्दल अनेक खुलासे राखीने केले आहेत.
नुकताच राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत हिने मोठा दावा केलाय. राखी सावंत थेट म्हणाली की, माझे आता दुबई बरोबर एक खास नाते तयार झाले आहे. मी दुबईमध्ये एक हॉटेल आणि एक क्लब सुरू केला आहे. ते पैसे दुबईच्याच लोकांचे आहेत, मी काय खूप श्रीमंत नाहीये.पुढे राखी सावंत हिने म्हटले की, मला दुबईमध्ये एक खास व्यक्ती भेटलाय. मी एकटी काय काय करू मला एका जीवनसाथीची खूप जास्त गरज आहे.
स्टेशन व्यवस्थित आहे, बाकी काय ट्रेन येत जात राहतीलच. म्हणजे आता आदिल दुर्रानी याच्यानंतर राखी सावंत हिच्या आयुष्यात दुसरा कोणीतरी व्यक्ती आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.पुढे राखी म्हणाली की, माझा आदिल दुर्रानी याच्यासोबत घटस्फोट घेणे बाकी आहे. मी दुबईला असताना त्याचे मला सतत फोन येत होते की, मला जेलबाहेर काढ. पण मी त्याला म्हटले की, ही माझी केस नाहीये. मला पण वाटत आहे की, आदिल दुर्रानी हा लवकर बाहेर यावा. कारण मला त्याच्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे.
COMMENTS