आमदार निलेश लंके यांच्याकडे देणार राजीनामा पारनेर / नगर सह्याद्री - माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार नीलेश लंके यांनी पारन...
आमदार निलेश लंके यांच्याकडे देणार राजीनामा
पारनेर / नगर सह्याद्री -
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार नीलेश लंके यांनी पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी संधी दिली असून ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा काळ पूर्ण होत असल्याने मी माझ्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा २२ जूनला देणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय औटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार औंटी यांच्या सह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुसरीकडे या कार्यकाळात माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले असून तरीपण माझ्या परीने आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरच्या पाणी प्रश्न सह इतर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याची नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले. नगराध्यक्षपदासाठी सभापती डॉ. विद्या बाळासाहेब कावरे व नगरसेवक नितीन अडसूळ यांच्यामध्ये चुरस असून या संबंधीचा निर्णय आमदार लंके घेणार आहेत.
नगराध्यक्ष पदाचा कालावधी हा चार ते पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आमदार लंके यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी राहिलो असून भविष्यात सुद्धा त्यांच्याबरोबर काम करणार आहे. त्यामुळे आमदार लंके यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. माझ्या सव्वा वर्षाचा कार्यकाळात पाणीप्रश्न गंभीर विषय हातात घेतला होता. पारनेरच्या पाणी प्रश्नावरून नगरपंचायतीच्या एका अकार्यक्षम अधिकार्याने माझ्या सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
नगराध्यक्षपदासाठी कावरे, अडसूळ स्पर्धामध्ये
पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी हे २२ जूनला आपला नगराध्यक्ष राजीनामा आमदार निलेश लंके यांच्याकडे सादर करणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी डॉटर विद्या बाळासाहेब कावरे व नगरसेवक नितीन अडसूळ हे प्रबळ दावेदार मानले जात असून या नगराध्यक्ष निवडीत कावरे की अडसूळ यापैकी कुणीची वर्णी लागते याकडेही लक्ष लागले आहे.
परंतु ही प्रक्रिया चालू असताना दुसरा गुन्हा दाखल झाला. परंतु न्यायालयाने या एका प्रकरणात लिनचीट दिली आहे.परंतु पारनेरची पाईपलाईन शेवटच्या टप्प्यात आणली माझ्या कार्यकाळात संविधानाची मिरवणूक काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांच्या हस्ते चांगला कार्यक्रम केला आहे.पारनेर शहरात हिंदू मुस्लिम ऐय टिकविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक सलोख व शांतता अबाधित राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. तर दुसरीकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
माझ्या वाढदिवसाला ७ कोटी रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ केला आहे. तर शहीद जवान बाबासाहेब कावरे यांच्या नावाने मार्ग नामकरण केले आहे. प्रजासत्ताक दिनी स्वच्छता कर्मचार्यांच्या हस्ते झेंडावंदन करून नवा पायंडा पाडला आहे. माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाचा मान दिला हे महत्त्वाचे आहे. मनकर्णिका नदी काशीनंतर पारनेरला असून तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन विकास करण्याचा माणसं होता, तो अधुरा राहिला असल्याची खंत नगराध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केली. तर कचर्यापासून खत निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प सुरू केला असून अल्प दरात खत उपलब्ध शेतकर्यांना देणार असल्याचे नगराध्यक्ष विजय औटी म्हणाले.
COMMENTS