मुंबई। नगर सहयाद्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्यसमन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करून मारहाण...
मुंबई। नगर सहयाद्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्यसमन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करून मारहाण करण्याची घटना घडली आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत अयोध्या पोळ यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी शाईफेकनंतरचे काही फोटोही पोस्ट केले. दरम्यान, या घटनेनंतर ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्याजवळील कळवा भागात शाईफेक झाल्याचा प्रकार शुक्रवार रात्री घडला. कळव्यातील मनिषा नगरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पौळ हजर होत्या. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.तर घटनास्थळी आलेले पोलिस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप देखील अयौध्या पौळ यांनी केला आहे.
ठाकरे गट आक्रमक!
विरोधी पक्षा आहे म्हणून एका महिलेवर हल्ला झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हल्ला करण्यात आलाय. अयोध्या पोळ महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत. त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी याचा तपास करावा. याला डरपोकपणा म्हणतात, समोरासमोर या, असे आव्हान संजय राऊत यांनी विरोधकांना केले आहे. शिंदेंची शिवसेना खोटी आहे. जत्रेतील खोट्या चंद्रावर बसून शिंदे फोटो काढत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
अयोध्या पौळ पाटील यांचं ट्वीट काय?
मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी. एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेनच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेन. असं म्हणत अयोध्या पौळ पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
COMMENTS