पारनेर | नगर सह्याद्री एकोबा तुकोबा निळोबा या नामघोशात टाळ मृदुंगाच्या गजरात सनई ताशाच्या सुरात संत सद्गुरुनिष्ठ निळोबारायांच्या दिंडीचे श्र...
पारनेर | नगर सह्याद्री
एकोबा तुकोबा निळोबा या नामघोशात टाळ मृदुंगाच्या गजरात सनई ताशाच्या सुरात संत सद्गुरुनिष्ठ निळोबारायांच्या दिंडीचे श्रीक्षेत्र पिंपळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्तानाचे वर्ष सातवे प्रस्थान प्रसंगी हभप विकासानंद महाराज मिसाळ यांचे किर्तन झाले.
पालखी सोहळ्याचे प्रस्थान प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवकांना पद्मभूषण अण्णासाहेब साहेब हजारे म्हटले की लोक चंद्रावर जातील किंवा अजून कुठेही जातील. परंतु अध्यात्म धार्मिकतेची जोड असल्याशिवाय आपण आपली प्रगती करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वारकरी भाविकांनी एक लक्षात घेतले पाहिजे की संतांचे आध्यात्मिक विचार आपण जर अंगी बाळगले तर आपण विनाशाकडे न जाता आपण प्रगती कडे वाटचाल करू. त्यामुळे प्रत्येकाने संतांचे अध्यात्मिक विचाराचे पालन करावे.
पद्मश्री पोपटराव पवार म्हटले की वारकरी परंपरेनुसार आज सर्व भाविक आनंदी आहेत. कारण पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतल्याशिवाय माहेरचा आनंद मिळत नाही. ज्यावेळेस आपण पंढरपूरकडे वाटचाल करत असतो त्यावेळेस जसे आपले सकारात्मक विचार असतात. तसेच सकारात्मक विचार जर आपण आपल्या गावी आल्यानंतर जर आचरणात आणले तर आज जे गावचे गाव उध्वस्त होत आहेत ते भविष्यात होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने वारीवरून आल्यानंतर संतांच्या विचाराचे आचरण करावे अन्यथा मोगलाई पेक्षाही मोठी मोगलाई माजल व गावच्या गाव उद्ध्वस्त होतील असे प्रतिपादन यावेळी वारकर्यांना पवार यांनी केले.
जिल्हाधिकारी सिद्धी राम सालीमठ यांनी यावेळी सांगितले की आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून २६० दिंड्या जात असून त्यामध्ये दोन लाखापेक्षा जास्त भाविक असतात तसेच मानाच्या दिंड्या म्हणून दुसर्या जिल्ह्यातून निवृत्तीनाथ महाराज एकनाथ महाराजांच्या दिंड येतात. आपल्या जिल्ह्यातील मानाची श्री संत सद्गुरु निष्ठ निळोबाराय महाराजांची दिंडी पंढरपूर ते जात असते पंढरपूरकडे जाणार्या सर्व भाविकांन सर्वात जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्रशासनाच्या वतीने अहमदनगर ते पंढरपूर पर्यंतच्या महामार्गाची पाहणी करण्यात आली आहे.
चालू वर्षी पालखीची पूजा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व मिनाक्षी सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते करण्यात आली. कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले की चालू वर्षी ६१ दिंड्यात सहभागी असून पिंपळनेर ते पंढरपूर पर्यंत निळोबारायांच्या दिंडीत ६० हजार पेक्षा भाविक सहभागी होत असतात दिवसेंदिवस निळोबारायांचा सोहळा मोठा होत चाललेला आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पद्मभूषण पोपटराव पवार, लोक उपायुक्त महाराष्ट्र राज्य संजय भाटिया, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मीनाक्षी सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, निळोबाराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोकराव सावंत, पालखी सोहळा प्रमुख व निळोबाराय वंशज गोपाळ काका मकाशीर, सरपंच देवेंद्र लटांबळे, उपसरपंच साधनाताई हजारे, सुरेश ज्ञानदेव पठारे, शिरूर नगरसेवक नीलेश लटांबळे, विजय गुगळे, पारनेर मार्केट कमिटी संचालक किसनराव रासकर, पारनेर पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS