पुणे। नगर सहयाद्री - विध्येच माहेर घर असलेल्या पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका पत्रकारावर दोघा अज...
पुणे। नगर सहयाद्री -
विध्येच माहेर घर असलेल्या पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका पत्रकारावर दोघा अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वृत्तसंस्थाच्या प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील स्वारगेट परिसरात काल रात्री एका हॉटेलच्या समोर पत्रकार हर्षद कटारिया याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
१५ दिवसांपूर्वीच हर्षद कटारियावर हल्ला झाला होता. कटारियावरील हल्ल्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS