मुंबई | नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रणौतने अभिनेता रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. तिने...
मुंबई | नगर सहयाद्री
अभिनेत्री कंगना रणौतने अभिनेता रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. तिने या दोघांना सुशांत सिंह राजपूतच्या निधनासही जबाबदार धरलं आहे. या दोघांनी सुशांतबद्दल नकारात्मक गोष्टी व अफवा पसरवल्याचा दावाही कंगनाने केला आहे. तिने या दोघांचा दुर्योधन व शकुनी असा उल्लेख केला. कंगना रणौत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हणाली, काल केलेल्या गोष्टी मी पुढे नेत आहे.
या चित्रपटसृष्टीत अनेक वाईट गोष्टी आहेत, परंतु त्यापैकी सर्वात वाईट म्हणजे दुर्योधन (पांढरा उंदीर) आणि शकुनी (पापा जो) यांची जोडी होय. ते लोक स्वत: मान्य करतात की त्यांना इतर लोकांबद्दल खूप मत्सर वाटतो. ते सर्वात जास्त गॉसिप्स करतात आणि स्वतःबद्दल असुरक्षित होतात. ते स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीतील गॉसिपचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय म्हणतात. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात हे दोघे खरे दोषी आहेत, हे संपूर्ण चित्रपटसृष्टीला माहीत आहे. या लोकांनी त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले.
त्यांनी माझ्याविरुद्ध अनेक चुकीच्या गोष्टीही पसरवल्या आहेत आणि माझ्या आणि हृतिकच्या भांडणात जबरदस्तीने हस्तक्षेप करून पंचाची भूमिका घेतली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत माझे आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त करत आहेत, असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. कंगनाने पुढे लिहिलं, मी या गोष्टी तुमच्यासमोर आणत आहे, त्यामुळे माझ्या चित्रपटांविरोधात एक पीआर टीम काम करत आहे.
COMMENTS