राहता। नगर सहयाद्री - महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी गणेश कारखाना आपला ताब्यात राहण्यासाठी ताकद लावली होती. शेवट...
राहता। नगर सहयाद्री -
महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी गणेश कारखाना आपला ताब्यात राहण्यासाठी ताकद लावली होती. शेवटच्या टप्प्यात विखे पिता-पुत्रांनी भावनिक सादही मतदारांना घातली होती. मात्र माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे विवेक कोल्हे यांनी विखेंच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. गणेश निवडणुकीतून सभासदांनी दडपशाहीचे झाकण उडवले असल्याचे प्रतिपादन विजयाचे शिल्पकार काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, राहत्या मधीलविरभद्र मंदिराच्या प्रांगणात झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार निलेश लंके, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, अरुण पाटील कडू, अॅड. नारायणराव कार्ले, प्रभावती घोगरे, सुहास वाहाडणे, करण ससाणे, आदींसह राहाता तालुक्यातील पक्षांचे पदाधिकारी व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
विखेंची फिल्डिंग फेल
हा कारखाना विखेंच्या मतदारसंघात आहे. त्यामुळे विखेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांनी गणेश कारखाना आपला ताब्यात राहण्यासाठी ताकद लावली होती. शेवटच्या टप्प्यात विखे पिता-पुत्रांनी भावनिक सादही मतदारांना घातली होती. ही निवडणूक दोन्ही गटासाठी चुरशीशी व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची झाली होती. मात्र १९ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत कोल्हे थोरात गटाने गणेश परिसरावरील आपलं वर्चस्व प्रस्थापित केले
थोरात म्हणाले, वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात प्रचार सभेला परवानगी दिली नाही. प्रशासनाने नेहमी निरपेक्ष राहिले पाहिजे. सत्ताधार्यांच्या दडपशाहीला बळी पडू नये. या परिसरात दहशतीचे आणि दडपशाहीचे राजकारण आहे. मात्र गणेश परिसरातील सभासदांनी दडपशाहीचे झाकण आज उडवले आहे. या परिसराला स्वातंत्र्य मिळाले आहे. सभासदांबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता ही या निवडणुकीत अगदी सक्रिय झाले होते. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा व सभासदांचा असून परिवर्तनाची सुरुवात झाली आहे.
पुढे बोलतांना थोरात म्हणाले, महसूल खाते आपण सर्वाधिक काळ सांभाळले. मात्र कुणावर केसेस केल्या नाही. दडपशाहीचे राजकारण कधी केले नाही. प्रेमाचे राजकारण आणि चांगला हेतू ठेवून आपण काम करतो. या परिसरात आनंद निर्माण व्हावा हाच आपला उद्देश आहे. निळवंडे धरणात १०,००० एमटीएफसी पाणी शिल्लक असताना अवघे २०० एमटीएफसी पाणी सोडले. आम्ही आनंदात सहभागी झालो तर पाणी बंद केले. पाणी सुरू राहिले असते तर शेतकर्यांच्या आनंदच मिळाला असता विहिरींना पाणी आले असते परंतु त्यांना आनंद पहावत नाही. असे ते म्हणाले.
COMMENTS