अहमदनगर | नगर सह्याद्री शेतीसाठी दिवसा बारा तास वीज द्यावी, तसेच नादुरूस्त ट्रांसफार्मर ४८ तासात महावितरणाच्या यंत्रणेमार्फत बदलून देण्यात य...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शेतीसाठी दिवसा बारा तास वीज द्यावी, तसेच नादुरूस्त ट्रांसफार्मर ४८ तासात महावितरणाच्या यंत्रणेमार्फत बदलून देण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष परदेशी समवेत जिल्हा संघटक तुकाराम शिंगटे, विजय भंडारे, सुरेशराव लांबे, ऋषिकेश इरूळे, लक्ष्मीताई देशमुख, दादासाहेब काकडे, जयसिंग उगले, रामजी शिदोरे, सुदाम निकत, सुरेश सुपेकर, भगवान भोगाडे, सुरेशराव लांबे, मुकुंदराव आंधळे, रावसाहेब भोर, नानासाहेब पारधे, गोरक्ष पालवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
शेतामध्ये ज्या विद्युत तारा धोकादायक पद्धतीने लोंबकळलेल्या, पोल वाकलेल्या स्थितीत आहेत. शेतामध्ये पोल वाकले असून विजेच्या तारा खाली लोमकळत असून सदर ठिकाणी याबाबतीत अनेकवेळा मागणी करून देखील सदरील ६३ चा असून ट्रांसफार्मर १०० चा मिळालेला नाही. तरी ते तात्काळ बदलून मिळावे तसेच अनेक डीपीवर केबल हे जळालेली असून त्यामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील ट्रांसफार्मर वर केबल त्वरित बदलण्यात यावे. सदरील कामेही पावसाळा सुरू होण्याअगोदर करण्यात यावे. या मागणीचे निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसून विद्युत महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.
त्यामध्ये विद्युत महावितरणाच्या अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिले. यामध्ये म्हटले आहे की ट्रांसफार्मर ची क्षमता वाढ करण्यात आली असून निंबोडी गावठाण येथे नवीन ट्रांसफार्मर तातडीने मंजूर करण्यात आले आहे. निधी उपलब्धतेनुसार साधनसामग्रीच्या उपलब्धतेप्रमाणे पुढील नियोजित कामे पूर्ण करून देण्यात येतील तसेच डीपीवरील केबल वाकलेले पोल व लोमकळत असलेल्या तारा हे मान्सून पूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरिता कंत्राटदारांच्या बैठका घेऊन सदर कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याकरिता सुचित केले असल्याचे पत्रात म्हटले आहे त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
COMMENTS