प्रभू देवा यांनी २०२० मध्ये हिमानीशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या घरात चौथ्यांदा बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला.
मुंबई / नगर सह्याद्री -
प्रभूदेवा हे साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. अभिनेता असण्यासोबतच ते कोरिओग्राफरही आहे. प्रभुदेवाने बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनसोबत लक्ष्य चित्रपटातील मैं ऐसा क्यों हूं हे गाणे कोरिओग्राफ केले होते. यासाठी प्रभू देवाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता नुकतेच प्रभू देवा यांनी पुन्हा एकदा वडील झाल्याचे सांगितले आहे.
प्रभू देवा यांनी २०२० मध्ये हिमानीशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या घरात चौथ्यांदा बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. अलीकडेच, प्रभू देवा यांनी एका मुलाखतीत ही बातमी उघड केली आणि आनंद व्यक्त करताना म्हटले, “होय सर. हे खरं आहे. या वयात मी पुन्हा वडील झालो आहे. मला खूप आनंद आणि समाधान वाटत आहे."
प्रभू देवा आधीच तीन मुलांचे वडील होते. आता त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला असून ते आपल्या मुलीच्या जन्माने खूप आनंदी आहे. मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करताना प्रभू म्हणाले, 'मी माझे काम आधीच कमी केले आहे. मला वाटले मी खूप काम करतोय, धावतोय. आता मी खूप काही केले आहे. मला आता माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.'
COMMENTS