यावेळी अजय आणि काजोलने काही प्रश्नांची मजेशीर उत्तरंसुद्धा दिली.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबई : अभिनेत्री काजोल लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. द ट्रायल या आगामी सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारत असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सीरिजच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात काजोलचा पती अजय देवगण प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. यावेळी अजय आणि काजोलने काही प्रश्नांची मजेशीर उत्तरंसुद्धा दिली. घरातील सर्व निर्णय कोण घेतं, असा प्रश्न विचारल्यावर अजयने भन्नाट उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यावर नेटकर्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सोमवारी १२ जून रोजी काजोलच्या द ट्रायल या पहिल्या वहिल्या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या कोर्टरुम ड्रामामध्ये काजोलने नोयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारली आहे. स्कँडलमुळे पतीला अटक झाल्यानंतर ती वकिल म्हणून पुन्हा कामावर परतते आणि त्यानंतर पुढे काय घडतं, याची कथा सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे. काजोलच्या रिल आणि रिअल कॅरेटरमध्ये काही साम्य आहे का? घरातील महत्त्वपूर्ण निर्णय कोण घेतं? तू की काजोल, असा प्रश्न ट्रेलर लाँचदरम्यान अजयला विचारण्यात आला होता.
त्यावर अजय उत्तर देण्याआधीच काजोल म्हणते, अजिबात नाही, याचं उत्तर मी देते. यावेळी तिच्या बाजूलाच बसलेला अजय मुलाखत घेणार्या व्यक्तीला विचारतो, तुमचं लग्न झालंय का? हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. तर मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हीसुद्धा देऊ शकता. ज्यांचं लग्न झालंय ते सर्वजण याचं उत्तर देऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर एकच असेल. प्रत्येक जण याचं उत्तर एकसारखंच देईल, असं अजय पुढे म्हणतो. अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हलचलफ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. १९९९ मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर २००३ मध्ये काजोलने निसाला जन्म दिला. काजोल आणि अजयला युग नावाचा एक मुलगासुद्धा आहे. २०१० मध्ये काजोलने युगला जन्म दिला.
COMMENTS