अहमदनगर | नगर सह्याद्री- ग्रामीण भागात शेतकर्यांच्या शेतातील विहिरीवरील विजपंपांची केबल चोरणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शा...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
ग्रामीण भागात शेतकर्यांच्या शेतातील विहिरीवरील विजपंपांची केबल चोरणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून चोरीचे साहित्य विकत घेणार्या भंगार विक्रेत्यालाही पकडण्यात आले आहे.
नगर तालुयातील गुणवडी येथील तलावाच्या परिसरातून अनेक शेतकर्यांच्या वीजपंपांच्या केबल वारंवार चोरीला गेल्या होत्या. याबाबत दि.७ जूनला नगर तालुका पोलिस ठाण्यात पुन्हा एक गुन्हा दाखल झाला होता. सर्व शेतकर्यांच्या वतीने प्रदीप छगन नागवडे यांनी फिर्याद दिली होती. तसेच ग्रामस्थांनी या चोर्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश आहेर यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पो.नि.आहेर यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.हे.कॉ.मनोहर गोसावी, पो.ना.रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पो.कॉ.शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, सागर ससाणे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन आरोपींच्या शोधासाठी रवाना केले.या पथकाने चौकशी केल्यावर सदर गुन्हा आकाश गोरख बर्डे (वय २४,रा. कुरणवाडी, बारगांव नांदुर, ता. राहुरी) याने त्याच्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला राहत्या घरा जवळ सापळा लावुन ताब्यात घेतले. त्याच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्याने सारंग बर्डे (रा. गुणवडी, ता. नगर), नवनाथ ऊर्फ वीर पवार (फरार) साईनाथ पवार (फरार), शक्तीमान गायकवाड (फरार), सोमनाथ गायकवाड, (फरार) व अरुण बर्डे (फरार) (सर्व रा. गुणवडी, ता. नगर) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली. यातील सागर गुलाब बर्डे याला पकडल्यावर त्याने चोरी केलेल्या केबल वायर जाळुन त्यातील तांबे बेलापुर, ता. श्रीरामपूर येथील भंगार दुकानदार जमील शहा यास वेळोवेळी विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी भंगार विक्रेता जमील इब्राहिम शहा (वय ४४, रा. वॉर्ड नं.२, ता. श्रीरामपूर) यालाही ताब्यात घेवून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सराईत गुन्हेगारांच्या टोळीने नगर तालुका, घारगांव व पारनेर परिसरात वीज पंपांच्या केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली आहे.
COMMENTS