अहमदनगर | नगर सह्याद्री महामार्गावर जबरी चोरी करणार्या लुटारुंच्या मुसक्या आवळण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. तीन आरोपींना जेरबंद...
अहमदनगर | नगर सह्याद्री
महामार्गावर जबरी चोरी करणार्या लुटारुंच्या मुसक्या आवळण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आठ जून २०२३ रोजी रात्री कोठला परिसरातून स्टेट बँकेकडे जाताना नवीन उड्डाणपुलाच्या अलीकडून पायी जाणारा पादचारी भरत विलास गजे (वय ३६ वर्षे, रा. बारादरी ता. नगर जि. अहमदनगर) यास तीन अनोळखी इसम मोटार सायकलवरून आला. त्याने पादचारीस आडवून शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्याकडील रोख रक्कम एक हजार रूपये व ओपो कंपनीचा मोबाईल बळजबरीने फिर्यादीस दगडाने मारहाण करून चोरून नेला होता. या प्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
स्टेट बँक चौक परिसरात ज्या आरोपींनी मारहाण करून लुटमार केली आहे, त्यामधील एक इसम एलआयसी परिसरात थांबला असल्याची माहिती भिंगार कॅम्पचे सपोनि. दिनकर मुंडे यांना मिळाली. त्यानुसार मुंडे यांनी तात्काळ एक पथक तयार करून सापळा लावला. कविराज शिवराज नायडू (वय २१ वर्षे रा. कोंबडीवाला मळा, सोलापुर रोड, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता हा गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच अरविंद अशोक पिल्ले (वय २२ वर्षे रा. कवडे नगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर, भिंगार), शाहरूक चांद शेख (वय २२ वर्षे रा. कवडे नगर, आलमगीर, भिंगार) अशी साथीदारांची नावे सांगितली. इतर दोन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली ५० हजार रुपयांची एचएफ डिलस कंपनीची मोटर सायकल (क्र. एमएच १६, बीएस ८९३६) व रोख रक्कम एक हजार असा एकून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, सहा. पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, पोसई मंगेश रवननाथ दहीफळे, पोहेकॉ संदीप घोडके, पोना राहुल द्वारके, पोना दिलीप शिंदे, पोकाँ रमेश बेंडकोळी, पोहेकॉ दरेकर, पोकाँ अमोल आव्हाड, मपोकाँ तृप्ती कांबळे यांनी केली आहे.
COMMENTS