मात्र, विद्युत तार मजुराच्या अंगावर पडून त्याचा विद्युत तारेला स्पर्श झाला का, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
मुंबई / नगर सह्याद्री -
अडावद (जळगाव) येथील आठवडे बाजार भागात सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू असताना मुख्य वाहिनीच्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून ३३ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे भागात खळबळ उडाली असून वीज मंडळावर संताप व्यक्त केला जात आहे.
अडावद (ता. चोपडा) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवडे बाजार भागात ग्रामपंचायत कार्यालयापासून जवळच्या अंतरावर सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. शौचालयावरून मधोमध हाय व्होल्टेज पॉवर लाइन गेली आहे. अशातच गुरुवारी (८ मे) रोजी दोन जण शौचालय बांधकाम करीत होते. दुपारी दोनच्या सुमारास रहेमान गफ्फार मण्यार (वय ३३, रा. अडावद,ता. चोपडा) यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
मात्र, विद्युत तार मजुराच्या अंगावर पडून त्याचा विद्युत तारेला स्पर्श झाला का, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र विजेच्या ताराच्या कड्यामध्ये आल्याने मजुराचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.
COMMENTS