यामध्ये तीन महिलांचाही समावेश असून चोरीचा माल विकण्याच्या तयारीत असताना चतुश्रृंगी पोलिसांनी ही कारवाई केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
पुणे मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची चोरी करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश असून चोरीचा माल विकण्याच्या तयारीत असताना चतुश्रृंगी पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून लुटलेला सर्व माल जप्त करण्यात आला आहे.
पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील सध्या मेट्रो खांबासाठी लागणाऱ्या लोखंडी पट्ट्या चोरट्यांनी पळवल्या होत्या. अनिल सुजान काळे आणि दीपक मारूती काळे अशी या आरोपींची नावे आहेत.
औंध येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या आवारात अनिल आणि दीपक हे लोखंडी रॉड विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.
दुसरीकडे, मेट्रोचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी पुणे मेट्रो पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. या महिलांनी आचार्य आनंदऋषीजी चौक, गणेशखिंड रोड येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणाहून सळई, नट असे साहित्य चोरले होते. पोलिसांनी संबंधित महिलांना अटक केली असून चोरीचा माल कोणाला विकला याचा अधिक तपास सुरू आहे.
COMMENTS