निघोज | नगर सह्याद्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून निघोज -अळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या...
निघोज | नगर सह्याद्री
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून निघोज -अळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून येत्या सहा महिन्यात सर्वाधिक विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी दिली आहे.
खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद अहमदनगर दलीत वस्ती योजने अंतर्गत म्हसे खुर्द येथे हरिजन वस्ती व पुनर्वसन वस्ती येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे -१६ लक्ष रुपये या कामाचा भूमिपूजन शुभारंभ संदिप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन दिलीपराव मदगे हे होते.
तसेच यावेळी सरपंच निलम प्रविण उदमले, उपसरपंच नंदराज खोमणे, चेअरमन संभाजी मदगे, माजी उपसरपंच नवनाथ येळकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल मदगे, अंजना निरसड, माजी सदस्य नारायण मदगे, ग्रामसेवक बबन आढाव, प्रविण उदमले, सुरेश आढाव, बाळासाहेब हिंगे, संजय मदगे, शंकर निरसड, साहेबराव अवचार, पोपट खोमणे, अजित मदगे, सुरेश लोहकरे, पोपट गुंजाळ, भाऊसाहेब भालेकर, प्रियांका ठुबे, सत्यवान शिंदे, अरुण खरात, निलेश घोडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, ठेकेदार सुजय मदगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS