अहमदनगर / नगर सह्याद्री - वाळुंज येथे झालेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या युवा परीवर्तन पॅनलने सत्...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
वाळुंज येथे झालेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या युवा परीवर्तन पॅनलने सत्ताधारी भाजप गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडविला. तेरा पैकी अकरा जागेवर विजय मिळवला.
वांळुज (ता. नगर) येथे शनिवार दि. ३ रोजी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक प्रकिया पार पडली. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच झालेल्या सेवा संस्थेच्या निवणुकीत महाविकास आघाडीने खाते उघडले. या विजयी उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी जिल्हा परीषद सदस्य शरद झोडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी अर्थ व बांधकाम समितीचे अध्यक्ष बाळासाहेब हराळ, महानगर पालिकेचे नगरसेवक योगीराज गाडे, गिरीश जाधव शिवसेना तालुकाप्रमुख राजू भगत, उप तालुकाप्रमख प्रवीण गोरे उपस्थित होते\ या निवडणुकीत सरपंच नाना शेळमकर, कैलास राऊत, अविनाश शिंदे, संजय दरेकर, अनिल मोरे, सुमित रोहकले, सीताराम दरेकर, सोमनाथ जाधव, अर्जुन कर्डिले, निलेश शिंदे, सागर मते, कुंदन शिंदे, भाऊ शिंदे, शिंदे सुरज, गुलाब काकड़े, आकाश जाधव, भाऊसाहेब काकड़े, बाजीराव हिंगे, हरेश कर्डिले, सचिन गुंजाळ, मच्छिंद्र दरेकर, मकरंद हिंगे, दादा कनसे, प्रभाकर पवार, संजय हिंगे, बाळासाहेब हिंगे, सागर हिंगे, शिवाजी हिंगे, यांनी पॅनल विजयी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रा.अरविंद शिंदे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
विजयी उमेदवार -
रमाकांत नारायण शिंदे, हनुमंत महादु काकड़े, बापूसाहेब एकनाथ हिंगे, कुंडलिक मारुती दरेकर, मयूर अनिल दरेकर, रामकिसन भाऊ दरेकर, संभाजी आसाराम हिंगे, महादेव रानोजी गायकवाड, तुळसाबाई नामदेव दरेकर, मंदाबाई गुलाब दरेकर, भाऊ भगवंता जाधव. तर शेतकरी विकास पेनेलचे दोन उमेदवार विजयी झाले.
COMMENTS