संस्थेच्या संयोजकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन ः साठेखत रद्द करण्याची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री - नालेगाव येथील नियोजित पद्मपुरी विडी...
संस्थेच्या संयोजकांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन ः साठेखत रद्द करण्याची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री -
नालेगाव येथील नियोजित पद्मपुरी विडी व विणकर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची (दुर्बल घटक) जागा विकण्याचा घाट घातला जात असून, त्यासाठी चिफ प्रमोटरने बेकायदेशीरपणे नोंदविलेल्या साठेखतावरुन खरेदीखत नोंदविण्यात येऊ नये, अशी मागणी संस्थेचे संयोजक अॅड. राजू भास्कर गाली यांनी केली आहे.
गाली यांनी जिल्हाधिकार्यांना या संदर्भात निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की नालेगाव येथील २०८/२/३अ / २ / ३ब / २ या गटामध्ये नियोजित पद्मपुरी विडी व विणकर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची (दुर्बल घटक) मिळकत आहे. याचे चिफ प्रमोटर अंबादास रामचंद्र चिट्याल व मनोज लक्ष्मण दुलम यांनी सभासदांना विश्वासात न घेता व कोणत्याही प्रकारचे ठराव न घेता अर्जुन रघुनाथ शिंदे, सौरभ अर्जुन शिंदे, गणेश दत्तात्रय सांळुके, मनोज निवृत्ती लांडे व देवीदास शाळीग्राम ठाणगे यांच्या बरोबर जागेचे साठेखत केले आहे. दि. २४/०४/२०२३ रोजी साठेखताचे दस्त क्रं. २८६७/२०२३ अन्वये साठेखत लिहून नोंदवून दिले होते. या साठेखताच्या दस्तात सभासदांची व्यवहारास मंजुरी असल्याबाबत नमूद केले आहे. परंतु हे साठेखत नमूद असलेल्या व्यवहार सभासदांना मान्य नाही. सभासदांनी साठेखतबाबत कोणताही ठराव मंजूर केलेला नाही. झालेले साठेखत बेकायदेशीर असुन त्यास सभासदांचा विरोध आहे.
त्याअनुषंगाने सर्व सभासदांनी दि.०६/०६/२०२३ रोजी श्रमिक बालाजी मंदिर, सावेडी येथे सभा घेऊन आक्षेप नोंदविल्यानंतर चिफ प्रमोटर अंबादास रामचंद्र चिट्याल व मनोज लक्ष्मण दुलम यांनी सर्व सभासदांसमक्ष १००/- रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर लिहून दिलेले आहे की, सदर साठेखताचा दस्त हे चिफ प्रमोटर आठ ते पंधरा दिवसात रद्द करून देतील. तसा विश्वास व भरवसा सभासदांना दिलेला आहे. त्यामुळे वर नमूद केलेल्या मिळकतीबाबत कोणत्याही प्रकारचा खरेदीखताचा दस्त महसूल दप्तरी नोंदविण्यात येऊ नये, त्यास सर्व सभासदांचा विरोध आहे.
COMMENTS