बीड। नगर सहयाद्री - बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे एक धक्कादायक घटना समोर आला असून, व्हाट्सअॅप स्टेट्सला पतीसह फोटो ठेऊन एका 33 वर्षीय न...
बीड। नगर सहयाद्री -
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे एक धक्कादायक घटना समोर आला असून, व्हाट्सअॅप स्टेट्सला पतीसह फोटो ठेऊन एका 33 वर्षीय नर्सने गळफास घेत आत्महत्या केली आहे. शिरुर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही महिला कंत्राटी स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. शिवकन्या गोरख देवडे (वय 33, रा. पिंपळनेर ह. मु. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, शिवकन्या ही २०१० पासून शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी नर्स म्हणून काम करत होती. शिवकन्या यांचे पती गोरख देवडे हे ट्रकचालक असल्याने बाहेर होते. तर ११ वर्षांचा मुलगा नातेवाइकांकडे गेला होता. त्यामुळे शिवकन्या घरी एकठ्याच होत्या त्यामुळे त्याने राहत्या घरीच एका पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर हा सर्व प्रकार घरची खिडकी उघडी असल्याने शेजारच्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी ही सर्व बाब पोलिसांनी सांगितली.
घटनेची माहिती कळताच शिरूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी आरोग्य केंद्रात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आत्महत्येपूर्वी शिवकन्याने व्हाट्सअॅप (Whatsapp) स्टेट्सला पतीसह अन्य 3 जणांचे फोटो ठेवल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
COMMENTS