कल्याणमध्ये भीषण अपघात झाला आहे. बिघाड झालेल्या ट्रकने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात रिक्षातील तीन जण जखमी झाले.
मुंबई / नगर सह्याद्री -
कल्याणमध्ये भीषण अपघात झाला आहे. बिघाड झालेल्या ट्रकने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात रिक्षातील तीन जण जखमी झाले. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
कल्याणच्या ट्रॅक पूलजवळ आज सकाळी हा अपघात झाला. एका ट्रक मध्ये अचानक बिघाड झाला. बिघाड झालेल्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात रिक्षातील तीन जण जखमी झाले. जखमी प्रवाशांवर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.
हा ट्रक दुर्गाहून ट्रॅक पुलाच्या दिशेने येत होता. दरम्यान पत्रीपुलाजवळ टेलरमध्ये अचानक बिघाड झाला. ट्रकने चालक यू-टर्न घेत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन रिक्षांना त्याने धडक दिली. या धडकेत रिक्षाचालकांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कल्याण बाजार पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
COMMENTS