चित्रपटाशी संबंधित विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. आता या चित्रपटात आणखी एका स्टारची एन्ट्री झाल्याची बातमी येत आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्यांच्या चित्रपटातील ऍक्शनसाठी प्रसिद्ध आहे. सध्या त्यांनी दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या 'खतरों के खिलाडी' शोचे शूटिंग सुरू केले आहे. सिंघमच्या दोन यशस्वी भागांनंतर, रोहित आणि अजय आता 'सिंघम अगेन'साठी तयारी करत आहेत. चित्रपटाशी संबंधित विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. आता या चित्रपटात आणखी एका स्टारची एन्ट्री झाल्याची बातमी येत आहे.
रोहित शेट्टीने काही काळापूर्वी सिंघम अगेनच्या कास्टिंगची माहिती दिली होती. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात विकी कौशल देखील दिसणार आहे. सिंघम अगेन या चित्रपटासाठी विकी कौशलसाठी प्रॉप्सवर काम करत आहे.
रिपोर्ट्सनुसार, सिंघम अगेनचे शूटिंग यावर्षी ऑगस्टपासून सुरू होऊ शकते. भारतासह जगातील अनेक ठिकाणी चित्रपटाची शूटिंग करण्याची योजना आहे. सिंघम अगेनमध्ये विकी कौशलचे नाव आल्यानंतर स्टारकास्ट आणखीनच मोठी झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि विकी कौशल यांच्या नावांचा समावेश आहे. रोहितने सिंघमचे दोन भाग आधीच बनवले आहेत, पण त्यांना तिसरा भाग वेगळ्या पातळीवर न्यायचा आहे.
COMMENTS