स्पर्धा परीक्षेला देण्यासाठी आलेला एका मुलाने मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
स्पर्धा परीक्षेला देण्यासाठी आलेला एका मुलाने मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. ऋषिकेश पाटील (वय २४ वर्षे रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
पुणे येथील रामटेकडी येथील डिजिटल हब येथे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. फिर्यादी मुलगा येथे परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षेदरम्यान परीक्षार्थींचे मोबाईल, कागदपत्रे आणि बॅग बाहेर ठेवण्यात आल्या होत्या. आरोपी मुलाने त्याची बॅगही बाहेर ठेवली. मात्र परीक्षा संपल्यानंतर मुलाची बॅग सापडली नाही.
अन्य एका उमेदवाराची बॅग सापडली मात्र त्यातून मोबाईल गायब होता. परीक्षेदरम्यान मोबाईल चोरीला गेल्यास उमेदवारांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून ऋषिकेश पाटील याला ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी आरोपी हृषिकेश पाटील याच्याकडून मोबाईल संच, कॅल्क्युलेटर आणि एक गाडी असा एकूण ९६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी हृषीकेश पाटील हा उच्चशिक्षित मुलगा असून तो एका कंपनीत काम करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या घटनेचा अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.
COMMENTS