वर्धा महामार्गावरील जंगलपूर शिवारात तीन एसटी बसचा विचित्र अपघात झाला आहे. नागपूरहून वर्ध्याला जाणाऱ्या तिन्ही एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात
मुंबई / नगर सह्याद्री -
वर्धा महामार्गावरील जंगलपूर शिवारात तीन एसटी बसचा विचित्र अपघात झाला आहे. नागपूरहून वर्ध्याला जाणाऱ्या तिन्ही एसटी बसेसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात १५ ते १८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सेलू येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.
घटनास्थळावरून नागपूरहून वर्ध्याकडे जाणारी पहिली एसटी बस रस्त्यावर पंक्चर झाल्यामुळे उभी होती. मागून येणारी दुसरी एसटी बस तिथेच थांबली आणि पहिल्या बसमधील प्रवाशांना घेत असताना मागून येणाऱ्या तिसऱ्या एसटी बसने दोन्ही बसेसला जोरदार धडक दिली. आणि त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर नागपूर-वर्धा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
गोंदियाहून नागपूरकडे जाणाऱ्या कारचा गोंदिया-कोहमारा मार्गावर अपघात झाला असून अपघात इतका भीषण होता की, या अपघातात २४ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच कारमधील आणखी ४ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. महमद शेख असे मृत चालकाचे नाव आहे. अपघातग्रस्त कार गोंदियाहून नागपूरकडे जात होती. कोहमारा मार्गावरील भुसारीटोलाजवळ कार अनियंत्रित झाल्याने झाडावर आदळल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे.
COMMENTS