सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील सुपा गावासाठी वरदान ठरणारी विसापुर सुपा पाणी योजनेची चाचणी यशस्वी रित्या पार पडली असून सुपा गावचा पा...
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील सुपा गावासाठी वरदान ठरणारी विसापुर सुपा पाणी योजनेची चाचणी यशस्वी रित्या पार पडली असून सुपा गावचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे. सुपा गावासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मंजुर १४. ३१ कोटी रुपयांच्या योजनेचे काम पूर्णत्वास गेले आहे. अनेक वर्षांपासून हे काम धिम्या गतीने सुरू होते.
सरपंच मनिषा योगेश रोकडे, उपसरपंच दत्तात्रय पवार, माजी उपसरपंच सागर मैड यांची ग्रामपंचायतीवर वर्णी लागताच त्यांनी या योजनेच्या कामाला गती देण्याचा मानस केला होता. मात्र अनेक अडचणी यात होत्या. या सुपा पाणी योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेत त्यांनी कामाची सुरुवात केली. हि योजना मुळात ३ टप्प्यात असल्याचे समजले. पहिला टप्पा विसापुर ते सुपा जलवाहिनी होणे. दुसरा टप्पा सुपा गावात आलेले पाणी शुध्दीकरण होऊन वेगवेगळ्या ठिकाणच्या टायांमध्ये वितरण करणे, आणि तिसरा टप्पा त्या टायांमधून प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहच करणे. या तिनही टप्याचे काम समांतर सुरू होते. मात्र यात पहिल्या टप्प्यात म्हणजे विसापुर ते सुपा जलवाहिनी तुन पाणी सूरू करण्यासाठी खूप मोठ्या अडचणी होत्या. त्यासाठी पदाधिकारी यांनी मागील १७ ते १८ महिन्या पासुन प्रयत्न सुरू होते. विसापुर तलाव या ठिकाणी ज्याक्वेल तयार होणे, त्या ठिकाणी पंपसेट बसवणे, विज वितरणासाठी जागा मिळवून देणे, ज्या ज्या ठिकाणी जलवाहिनीस अडचणी आल्या त्या ठिकाणी पूर्ण करणे अश्या अनेक अडचणींवर मात करत आज या जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली.
या सर्व प्रक्रियेत खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून मार्गदर्शन घेतले. आवश्यक त्या ठिकाणी सुजय विखे यांनी स्वतः फोन करून काम मार्गी लागण्यास सहकार्य केल्याचे सरपंच रोकडे, मैड यांनी सांगितले.
ही चाचणी सोमवार दि. १७ एप्रिल पासून सुरु केली होती. ती शनिवार दि. २९ एप्रिल रोजी या पंधरा दिवसांच्या काळात पूर्ण झाली. या चाचणी साठी अनेकांनी सहकार्य केले. खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी वेळोवेळी या योजनेशी संबंधित अधिकारी वर्गाला संपर्क करुण या चाचणीचा मार्ग मोकळा केला. शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉल द्वारे या योजनेचा आढावा घेतला. तसेच संदेश कार्ले यांनी या चाचणी साठी तात्पुरत्या स्वरूपात विज जोड दिली आहे. ही पाणी योजना पूर्ण होऊन ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
विसापुर तलाव ते सुपा अमृत जलवाहिनीचे काम पूर्ण होत असून ही योजना सुपा गावासाठी निश्चितच वरदान ठरणार आहे. या योजनेतून सुपा गावासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. या जलवाहिनी वर १२० एचपीचे दोन पंप बसवण्यात आले आहे. त्यातला १ सदैव कार्यान्वित राहील आणि एक स्टँडबाय असेल. या ठिकाणाहून ताशी ८५००० लिटर पाणी येण्याची क्षमता या पंपात आहे. ज्यातून सुपा ग्रामंस्थाना हक्काचे मुबलक पाणी मिळू शकेल. या विसापुर सुपा अमृत जलवाहिनीच्या पाहिल्या टप्प्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेले २० टक्के काम म्हणजे या ठिकाणी विज जोडणी त्यावर उचीत मार्ग लवकरच निघेल.
-सागर मैड, माजी उपसरपंच, सुपा.
विसापूर सुपा पाणी योजनेसाठी तत्कालीन पादाधिकरी माजी सभापती कै. पोपटराव पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच कै. भाऊशेठ पवार, कै. संदिप पवार, माजी सभापती दिपक पवार, माजी सरपंच विजय पवार, माजी सरपंच राजूशेठ शेख, माजी सरपंच सुनिता बाळासाहेब पवार, विद्यमान उपसरपंच विजय पवार, माजी उपसरपंच सागर मैड, उपसरपंच दत्ता पवार, सर्व आजी - माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, मार्गदर्शक, सहकारी व समस्थ ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नांतून ही योजना मंजूर होऊन पूर्णत्वाकडे जात आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न करत आहोत.
-मनिषा योगेश रोकडे, सरपंच, सुपा.
COMMENTS