मुंबई नगर सहयाद्री - सपूर्ण राज्याचं लक्ष आसलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल गुरुवारी समोर आला आहे. अपात्र ठरवलेल्या १६ आम...
मुंबई नगर सहयाद्री -
सपूर्ण राज्याचं लक्ष आसलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल गुरुवारी समोर आला आहे. अपात्र ठरवलेल्या १६ आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी १६ आमदारच नव्हे तर विधानसभा अध्यक्षांवरही अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे असा मोठा दावा केला आहे.
अनिल परब म्हणाले, न्यायालयाने आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. नैसर्गिक न्यायाने ते योग्य आहे. पण हे प्रकरण अध्यक्षांकडे देतानाच न्यायालयाने काही चौकट आखून दिली आहे. व्हीप कुणाचा असावा? कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळलं पाहिजे, हे न्यायालयाने नमूद केलं आहे.हे सरकार घटनात्मक आहे, असं सरकारच्यावतीने सांगितलं. हे सरकार घटनात्मक का नाही हे आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत आहोत. कालच्या निकालाच्या प्रतमध्ये जी निरीक्षणे नोंदवली गेली आहेत, त्यावरून हे सरकार घटनाबाह्य असल्याचं दिसून येत आहे. कालच्या सरकारच्या पत्रकार परिषदेत अर्धवट माहिती दिली आहे
अनिल परब पुढे बोलताना म्हणाले,१६आमदार अपात्र झाल्यावर राहुल नार्वेकर यांचंही पद जाईल. कारण त्या १६ आमदारांनी मतदान करूनच त्यांना निवडलं आहे. अपात्रतेचा मुद्दा जाहीर होईल तेव्हा अध्यक्षही जातील. कारण ४० लोकांची मते घेऊन ते अध्यक्ष झाले आहेत, असं सांगतानाच कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून आम्ही आधी १६ आमदारांच्या अपात्रतेसंबधी अध्यक्षाकडे जाऊ. पण अध्यक्ष बेकायदेशीर कसा आहे. याची वेगळी दाद सर्वोच्च न्यायालयात मागू, असा असा मोठा दावा अनिल परब यांनी केला आहे.
COMMENTS