सर्वोच्च न्यायालयाने आप नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव आणि अटींसह ६ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सांगितले की, सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला जाईल. जामीनाच्या अटींनुसार त्यांना परवानगीशिवाय दिल्ली सोडता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या राजकीय भाषणबाजीपासून ते दूर राहतील.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने आप नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव आणि अटींसह ६ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. परवानगीशिवाय ते दिल्लीबाहेर जाऊ शकत नाहीत आणि प्रसारमाध्यमांना कोणतेही वक्तव्य करू शकत नाहीत. सत्येंद्र जैन गेल्या एक वर्षापासून तुरुंगात आहेत. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या वर्षी ३० मे रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
तत्पूर्वी, बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सत्येंद्र जैन सीजे-७ रुग्णालयाच्या एमआय रूमच्या बाथरूममध्ये घसरून पडले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयातून एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना सध्या आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
COMMENTS