अशाप्रकारे बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी पीडितेच्या वडिलांकडून 25 हजार रुपये घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली आणि विवाहित महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी बेपत्ता मुलींचा शोध घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. अशाप्रकारे बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी पीडितेच्या वडिलांकडून 25 हजार रुपये घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्याची आहे. पोलीस प्रशासनात माणुसकी उरली नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत. या संदर्भात पीडितेच्या पालकांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आपला घडलेला प्रकार त्रास कथन केला आहे.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही काळापासून पोलिसांची मनमानी सुरू आहे. बेपत्ता मुलीच्या वडिलांकडून पोलीस पैशाची मागणी करत असल्याची तक्रार या मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. त्यांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी नेकनूर पोलिसांनी २५ हजार रुपये घेतल्याचे दत्ता खराडे यांनी सांगितले.
यासह तपास करण्यासाठी पोलीस स्वत: चारचाकी आणण्यास सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मग नेकनूर पोलिसांनी माणुसकी विकली? जर कुंपणचं शेत खाणार असेल, तर दाद मागायची कोणाकडे ? असा सवाल पीडित मुलीच्या वडिलांचा आहे.
COMMENTS